सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (16:15 IST)

भावाने बहिणीवर बलात्कार केला, भावाला अटक

राजस्थानच्या गंगानगर येथे भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारे प्रकरण समोर आले आहे. येथे एका कलियुगी भावाने आपल्या बहिणीला वासनेची शिकार बनवले. मात्र, हृदयद्रावक घटनेनंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली
 
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुनी वस्ती परिसरात घरातील एकुलत्या एक मुलीवर तिच्या दत्तक भावाने बलात्कार केला. सुमारे वीस वर्षांपूर्वी पीडितेच्या वडिलांनी तिला दत्तक घेतल्याचे सांगितले जात आहे. पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आईने दुसरे लग्न केले. तेव्हापासून आरोपी कुटुंबापासून वेगळे राहू लागला आणि टेम्पो चालवून जीविकेचा निर्वाह करत होता.  चार वाजण्याच्या सुमारास आरोपी जुनी आबादी येथील पीडितेच्या घरी आला. वडिलांच्या मृत्यूनंतर पीडिता घरात एकटीच आईसोबत राहते. मात्र आरोपी घरी आल्यानंतर तिची आई घरात नव्हती. ओळख असल्यामुळे  पीडितेने त्याला घरात येऊ दिले. येथे संधी साधून त्याने पीडितेवर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
बाहेर गेलेल्या पीडित मुलीची आई घरी परतली आणि तिला रुग्णालयात दाखल करून पोलिसांना कळवले. पीडितेच्या आईकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महिला ठाणे पोलिसांनी शासकीय रुग्णालय गाठून गुन्हा दाखल केला. महिला पोलिस ठाण्याचे सीआय राजेश राणी यांनी सांगितले की, रात्रीच आरोपीचा शोध सुरू केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत.