1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 3 जानेवारी 2022 (21:29 IST)

आजीच्या प्रियकराने नातीचा बलात्कार करून हत्या केली ,आरोपीला अटक

दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये वृद्ध आजीच्या अवैध संबंधात अडथळा बनणाऱ्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलीची तिच्या आजीच्या 50 वर्षांच्या प्रियकराने निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. खून करण्यापूर्वी आरोपीने चिमुकलीवर बलात्कारही केला होता. हा खळबळजनक खून प्रकरण उघडकीस आणत पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली. या हत्येतील आजीची भूमिकाही तपासली जात आहे.
डीसीपी झोन-2 हरीश चंदर यांनी सांगितले की, 28 डिसेंबर रोजी पोलिस फेज-2 परिसरातील इलाहाबास गावात एका बांधकामाधीन घरात तीन वर्षांची मुलगी मृतावस्थेत आढळून आली. 25 डिसेंबर रोजी मुलीच्या आजीने फेज-2 पोलीस ठाण्यात ती घरातून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सोमवारी आरोपी हेमंत ( 50) याला अटक केली.
तपासादरम्यान हेमंत आणि मृत नातीच्या आजीचे अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांच्या  समोर आले. हेमंतला मयत नातीच्या आजीशी लग्न करायचे होते. त्याने सांगितले की, मुलीचे वडील एका खुनाच्या गुन्ह्यात आधीच तुरुंगात आहेत, तर तिची आई तिला सोडून तिच्या माहेरी गेली होती. डीसीपीने सांगितले की, आजी आणि तिच्या प्रियकराने नातीला मार्गातून दूर करण्याचा कट रचला होता, जो त्यांच्याअवैध संबंधात अडथळा बनत  होता.
चौकशीत पोलिसांना कळले की, घटनेच्या दिवशी हेमंत मुलीला घेऊन इलाहाबास गावाकडे निघाला होता. आरोपीने मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता.