रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:27 IST)

शेकडो प्रवासी अडकले

महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या (Omicron) प्रकरणांमध्येही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकने महाराष्ट्राच्या सीमेवरील चेक पोस्टवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. त्यांनी मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या बसेस परत पाठवल्या आहेत.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कोविड स्क्रीनिंग वाढवण्यात आले आहे. यावेळी बसमधील प्रवाशांचे आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये बहुतांश रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे, मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या 20 हून अधिक बसेस परत पाठवण्यात आल्या.

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे देशातील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होत आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा निर्बंध सुरू झाले आहेत. कर्नाटकमध्येही नववर्षानिमित्त रात्री कर्फ्यूसारखे नियम लागू केले असून येत्या काही दिवसांत राज्यात आणखी कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.