शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (17:41 IST)

फुग्यात गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, पाच जखमी

रविवारच्या मेळाव्याच्यादरम्यान फुग्यांमध्ये गॅस भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचे लोक घाबरले. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये तीन मुलांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला इंदूरला रेफर करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनमधील खाक चौक अंकपत मार्गावर दर रविवारी सकाळी मेळाव्या चे आयोजन केले जाते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक येतात. कोरोनामुळे काही काळ हा कार्यक्रम बंद ठेवण्यात आला होता, मात्र यावेळी कोविडची बंदी संपल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यात आला. रविवारी लहान मुले, वृद्ध, तरुण, महिलांसह अनेकजण येथे पोहोचले होते. सकाळी 6.30 च्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. यादरम्यान हा अपघात झाला. फुग्यांमध्ये सिलिंडर भरत असताना सिलिंडरचा स्फोट झाला. तेथे उपस्थित असलेले लोक त्याच्या तावडीत आले. पाच जण जखमी झाले. त्या पैकी एक जण गंभीररित्या जखमी झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूची भिंत तुटली. एका कारचेही नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच जिवाजीगंज पोलीस ठाणे आणि बीडीएसचे पथक घटनास्थळी पोहोचले. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे, त्या ठिकाणी जवळच एक दुकान असून तेथे फुग्यांमध्ये सिलिंडरमधून गॅस भरला जातो, असे सांगण्यात आले. सकाळी दुकानदार दुकानात आला आणि गॅस भरू लागला. याच दरम्यान हा अपघात झाला. अपघातात नक्ष (8) अल्ताफ (40), संतोष (18), गौतम (15), आस्था (14) हे जखमी झाले. यामध्ये नक्ष गंभीररित्या जखमी झाला,असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.  त्याला उपचारासाठी इंदूरला रेफर करण्यात आले. उर्वरित जखमींवर उज्जैन येथे उपचार सुरू आहेत.
बीडीएस प्रभारी यांनी सांगितले की, सिलिंडरमधील वेगवेगळ्या रसायनांपासून हायड्रोजन गॅस तयार केला जातो. हायड्रोजन वायूमध्ये चुकीच्या मिश्रणामुळे हा अपघात झाला असावा. गॅस सिलिंडरचे भाग जप्त करून सागरच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत. ज्या दुकानात अपघात झाला त्या दुकानदाराने घटनेनंतर पळ काढला.