शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (14:58 IST)

नवोदय विद्यालयातील 85 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

85 students of Navodaya Vidyalaya corona positive Marathi National News In Webdunia Marathi
सध्या कोरोनाच्या उद्रेक पुन्हा सुरु आहे. देशात कोरोनाचे प्रकरण येत आहे. सध्या शाळा देखील सुरु आहे. नैनिताल जिल्ह्यातील भवाली-अलमोडा NH मध्ये असलेल्या सुयलबाडी जवाहर नवोदय विद्यालयात शनिवारी 85 विद्यार्थ्यांना एकत्र कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्याने आरोग्य विभाग हादरले आहेत .संपूर्ण सुयालबाड़ी परिसर कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. लागण लागलेय मुलांना  शाळेतच आयसोलेशन करण्यात आले आहे. इतर निगेटिव्ह आलेल्या मुलांना घरी पाठविण्याचा विचार केला जात आहे. रविवारी सर्व विद्यार्थ्यांचे नमुने ओमिक्रॉन चाचणीसाठी दिल्लीला पाठवले जातील.
सध्या सुयालबाड़ी जवाहर नवोदय विद्यालयात 600 विद्यार्थी आहेत. नुकतीच खबरदारीचा उपाय म्हणून शाळेत सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी झाली. बुधवारी तीन विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले, तर गुरुवारी आठ विद्यार्थी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनाही कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. कोरोना सॅम्पलिंग प्रभारी गिरीश पांडे यांनी सांगितले की, शनिवारी आलेल्या अहवालात आणखी 85 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
कोरोना विषाणूची प्रकरणे समोर आल्यानंतर उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार शाळा आधीच मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आली आहे. 
कोरोनाच्या बाबतीत दिवसेंदिवस बेफिक्रीपणा वाढतच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नववर्ष साजरा करण्यासाठी नागपुरातून एक 19 वर्षाचा तरुण पर्यटनासाठी आला होता. त्याला देखील कोरोनाची लागण लागल्याचे आढल्यापासून तो फरार झाला आहे. या मुळे संपूर्ण शहरात गोंधळ माजला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनंतर पोलीस त्या बाधित तरुणाचा शोध घेत आहे.