1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (23:54 IST)

जम्मू काश्मीर मध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केल वर तीव्रता 5.1

जम्मू -काश्मीर मध्ये 2022 ची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. आज सकाळी जम्मू -काश्मीर मध्ये कटरा येथील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली आहे. तर दुसरी कडे जम्मू-काश्मीर मध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर मध्ये आज संध्याकाळी 6:45 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.1 होती. अफगाणिस्तानातील फैजाबाद हे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे. 
या भूकंपात जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.