शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (18:42 IST)

अवघ्या 50 रुपयांसाठी पिताने मुलाचा जीव घेतला, आरोपी पिताला अटक

मुंबईतील ठाण्याच्या कळवा परिसरात एका निर्दयी बापाने आपल्या 10 वर्षाच्या मुलाचा 50 रुपये चोरल्याचा संशयातून मारहाण करून जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करण प्रजापती असे या मयत मुलाचे नाव असून संदीप उर्फ बबलू ओमप्रकाश प्रजापती असे आरोपी पिता चे नाव आहे. आरोपी संदीप ला दारूचे व्यसन आहे. घटनेच्या दिवशी आरोपी पिताने दारूच्या नशेत आपल्या मुलाला तू 50 रुपये चोरले असे म्हणत अमानुषरित्या मारहाण केली. करण ला मारहाणीत गंभीर दुखापत झाली असून त्याचे मारहाणीत दोन्ही हात आणि डावा पायाला फ्रॅक्चर झाले असून त्याचा मृत्यू डोक्याला मार लागून कवटी फुटल्याने झाला. अशी माहिती शवविच्छेदनानंतरच्या अहवालातून मिळाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मयत करणच्या बहिणीने दिली पप्पांनी करण ची दारूच्या नशेत हत्या केली असे बहिणींनी जबानी दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर त्यांना करणचा मृतदेह एका चादरीत जखमी अवस्थेत गुंडाळलेला आढळून आला. त्याच्या अंगावर मारल्याच्या खाणाखुणा होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठविले आहे. पोलिसांनी आरोपी पिताच्या विरोधात हत्याच्या गुन्हा दाखल करून आरोपी पिताला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.