बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 2 जानेवारी 2022 (16:08 IST)

भटक्या कुत्र्यांनी केली निष्पाप मुलीची शिकार

भोपाळ शहरातील बागसेवानिया येथील अंजली विहार फेज-2 मध्ये एका चार वर्षांच्या निष्पाप मुलीवर पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामुळे मुलीला रक्तस्त्राव झाला. एका वाटसरूने कुत्र्यांना हुसकावून लावल्यावर मुलीचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने उत्तर मागितले आहे .
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भटक्या कुत्र्यांनी चार वर्षांच्या मुलीला चावा घेतला. बाग सेवेनिया परिसरात या मुलीवर 5 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. मुलीच्या डोक्यावर, कानाला आणि हातावर खोल जखमा झाल्या आहेत. चेहऱ्यासोबतच पोट, कंबर आणि खांद्यावर जखमा होत्या.
ही घटना शनिवारी दुपारी 4.15 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुलीचे वडील राजेश बन्सल हे मजूरी चे काम करतात. शनिवारी सायंकाळी त्यांची चार वर्षांची मुलगी गुड्डी जवळच खेळत असताना कळपात आलेल्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. ती धावत आली, पण कुत्र्यांनी तिला घेरलं आणि ओरबाडू लागले . एका तरुणाने दगडफेक करून कुत्र्यांना हुसकावून लावले. रक्तबंबाळ झालेल्या गुड्डीला जेपी रुग्णालयात नेण्यात आले. येथून तिला हमीदिया रुग्णालयात रेफर करण्यात आले. तेथून तिला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.