गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (09:46 IST)

आमदाराच्या मुलानी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली

मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील बारगी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार संजय यादव यांचा 17 वर्षीय मुलाने गुरुवारी घरातील बाथरूममध्ये कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली.
 
जबलपूरच्या गोरखपूर क्षेत्राचे शहर पोलीस अधीक्षक आलोक शर्मा यांनी सांगितले की, हाथीताल  गोरखपूर येथील आमदार संजय यादव यांचा मुलगा वैभव यादव (17) याने दुपारी 4 वाजता  घराच्या बाथरूममध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्याला तातडीने जवळच्या भंडारी रुग्णालयात उपचारासाठी नेले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांनी सांगितले की, आत्महत्येत वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. बहुगुणा म्हणाले की, आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही