शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (14:40 IST)

55 प्रवाशांना घेऊन येणारे विमान लँडिंग करताना रनवे वरून घसरले

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील डुमना विमानतळावर शनिवारी सकाळी अलायन्स एअरचे विमान घसरले. दिल्लीहून जबलपूरला विमानात आलेल्या 55 ​​प्रवाशांना काहीही झाले नाही, ही दिलासादायक बाब आहे. प्रत्यक्षात विमान लँडिंगच्या वेळी रनवे वरून घसरले. वैमानिकांनी प्रसंगावधान ठेऊन विमान रनवे वर आणले. डीजीसीए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलायन्स एअर फ्लाइटमध्ये 55प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते. डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 
 
दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या अलायन्स एअरच्या फ्लाइट क्रमांक E-9167 ला शनिवारी दुपारी हा अपघात झाला. लँडिंग केल्यानंतर लगेचच विमान अनियंत्रितपणे धावपट्टीवरून पलटले. विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. एकही प्रवासी जखमी झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. 
 
विमान रनवे वरून घसरून  बाजूला असलेल्या मुरुमात अडकले. यामुळे विमानाच्या पुढच्या बाजूला लावलेले लँडिंग फ्रंट व्हील खराब झाले. याची माहिती मिळताच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी धावपट्टीवर पोहोचून विमानातील प्रवाशांचे सांत्वन केले. दिल्ली-जबलपूर विमान ATR-72 विमानाने संचालित केले  जाते. विमानाने सकाळी 11:30 वाजता दिल्लीतून उड्डाण केले आणि 1:15 वाजता जबलपूरला उतरवले.
 
खबरदारी म्हणून विमानतळ अधिकाऱ्यांनी धावपट्टीवर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अलायन्स एअरचे नियमित विमान अपघातातून कसे वाचले याबाबत अधिकारी मौन बाळगून आहेत. विमानतळ संचालिका यांनी सांगितले की, या घटनेमुळे विमानतळावरील कामकाज चार-पाच तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते.