1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (10:53 IST)

एअर इंडियाची मालकी घेताच टाटा ग्रुपने घेतला 'हा' निर्णय

एअर इंडियाची मालकी आता अधिकृतरित्या टाटा कंपनीकडे गेली आहे. यासंदर्भात मालकी हक्कांचं हस्तांतरण पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्यावर्षी 8 ऑक्टोबर रोजीच टाटा समूहाने 18 हजार कोटींच्या बोलीत एअर इंडियाला खरेदी केली. 2700 कोटी रुपये रोख रक्कम आणि 15300 कोटी रुपयांचा कर्ज आपल्या डोक्यावर घेत टाटानं एअर इंडियाला आपल्या ताब्यात घेतली.
 
एएनआयच्या वृत्तानुसार, एअर इंडियाची मालकी स्वीकारताच टाटा ग्रुपने सर्वप्रथम एअर इंडियाच्या लेटलतिफपणाला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे.
 
एअर इंडियाच्या विमानांचं उड्डाण वेळापत्रकानुसार होईल यासाठी टाटा ग्रुप प्राधान्य देणार आहे.
यासोबतच एअर इंडियाच्या विमानांमध्येही काही बदल केले जाऊ शकतात अशी चर्चा आहे. विमानातील आसन व्यवस्था, केबिन क्रू पेहराव, जेवणाची गुणवत्ता याकडेही प्रामुख्याने लक्ष दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.