सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (11:29 IST)

मान्सूनचं रौद्ररुप;ढगफुटी झाल्यानं वाहनं वाहून गेली

पावसाने उत्तरभारतात रोद्र रूप दाखवले आहे.उत्तर भारतात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.आज हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे मान्सून ने रोद्र रूप धारण केले आहे त्या मुळे ढगफुटी झाल्यानं धर्मशाळा आणि त्याच्या जवळील भागसू भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं असून घराचे नुकसान झाले आहे पाणी वेगाने आल्यामुळे काही पर्यटनस्थळी चारचाकी वाहने देखील पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त मिळत आहे.  
 
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि रविवारची सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटन स्थळी पोहोचत आहे.अशा परिस्थिती अचानक झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या पुरात चारचाकी वाहने वाहून गेल्या आणि असंख्य पर्यटक त्या ठिकाणी अडकून बसले आहे.