शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (11:40 IST)

चक्क रुग्णालयात बांधली लग्नगाठ

लग्न हे अविस्मरणीय बनवण्यासाठी कुटुंबातील सदस्य बर्‍याच महिन्यांपासून त्याची तयारी सुरू करतात.  पारंपारिक विधीच्या वेळी नवनवीन विधी केले जातात, अनोखे कपडे घातले जातात आणि आनंदाचा प्रत्येक क्षण टिपला जातो. पण, कधी कधी नियतीला वेगळंच मान्य असतं आणि घरात बसल्या बसल्या संकटं येतात.
 
असाच एक प्रकार कोटा येथे पाहायला मिळाला, जेव्हा लग्नाच्या काही दिवस आधी वधूचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.
 
 लग्नाची मिरवणूक घेऊन वर हॉस्पिटलमध्ये पोहोचले
प्रत्यक्षात रविवारी एमबीएस हॉस्पिटलमध्ये एक अनोखा विवाह पार पडला. याठिकाणी दाखल झालेल्या नववधूला घेण्यासाठी वरपक्ष मिरवणूक घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. दोघांनीही कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले. या अनोख्या लग्नाचे साक्षीदार होते रुग्णालयातील कॉटेज वॉर्डात दाखल असलेले रुग्णही. हॉस्पिटलच्या कॉटेज वॉर्डमध्ये एक खोली बुक करून सजवली होती, जिथे लग्नसोहळा पार पडला. सध्या वधूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडी भागातील भावपुरा येथील रहिवासी असलेल्या पंकजचे शनिवारी रावतभाटा येथील रहिवासी मधु राठौरसोबत लग्न होणार होते. गेल्या 1 आठवड्यापासून दोन्ही घरात लग्नाचे विधी सुरू होते.  यावेळी मधु रावतभाटा येथे वधू जिन्यावरून पडली असून तिचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले व डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.घाईतच तिच्या कुटुंबीयांनी तिला कोटामध्ये घेऊन गेले असून तिला एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंकजचे वडील शिवलाल राठोड आणि मधुचे वडील रमेश राठोड यांच्यात चर्चा झाली, त्यानंतर रुग्णालयातच लग्नाचे विधी पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
Edited by : Smita Joshi