1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (13:01 IST)

महिलेने एकाच वेळी 4 बाळांना दिला जन्म, कुटुंबात आनंदाचे वातावरण

Sitamarhi News
सीतामढी मध्ये एका महिलेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितले की आई आणि नावाजत बाळांची प्रकृती चांगली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण बाजापट्टी क्षेत्रातील शहारोवा गावातील आहे.येथील निवासी रमेश कुमार यांची पत्नी रूपी कुमारी या गर्भवती होत्या. त्याचवेळी पत्नी रुपी यांना प्रसूती वेदना होऊ लागल्याने रमेश यांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. प्रसूतीपूर्वी डॉक्टरांनी महिलेचे अल्ट्रासाऊंड केले, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त मुले असल्याची पुष्टी झाली. तसेच नंतर एकसाथ चार बाळांचा जन्म झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच पण कुटुंबियांना आनंद झाला. या महिलेने पहले एक मुलगी आणि नंतर तीन मुले यांना जन्म दिला. तसेच डॉक्टरांनी सांगितले की आई आणि नावाजत बाळांची प्रकृती चांगली आहे. 

Edited By- Dhanashri Naik