गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (23:01 IST)

येथे आकाशातून आगीचा गोळा पडून मोठा प्रकाश होऊन स्फोट झाला

There was a huge explosion of fire from the sky येथे आकाशातून आगीचा गोळा पडून मोठा प्रकाश होऊन स्फोट झाला Marathi National  News In Webdunia Marathi
राजस्थानच्या नागौर येथे धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यात बडायली गावात आकाशातून आगीचा गोळा जमिनीवर पडून मोठा प्रकाश होऊन स्फोट झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली नसती तर कुणाचाही विश्वास बसला नसता. अचानक आगीचा गोळा आकाशातून पडताना मोठा प्रकाश होऊन स्फोट झाला. ही घटना खगोलीय घटना असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेत आगीचा गोळा पडताना दिसतो त्याला उल्का पिंड किंवा पडणारा तारा असे म्हणतात. हे उल्का पिंड जमिनीवर पडण्याच्या पूर्वीच हवेत जळून नष्ट होतात. परंतु हे उल्का पिंड प्रथमच लोकांनी जमिनीवर आदळताना पाहिलेत. तज्ज्ञ याला मोठी खगोलीय घटना मानत आहे .
या प्रकरणाला दुजोरा देताना गावातील हॉटेल चालक उम्मेद सिंग यांनी सांगितले की, दररोज प्रमाणे मी हॉटेल ला आल्यावर सीसीटीव्ही तपासतो, कालही देखील तपासले तेव्हा हॉटेल समोरच्या शेतात रात्री 1:37 वाजता आगीचा गोळा मोठा प्रकाशासह पडल्याचे पहिले.