Death threat to Prime Minister Modi :केरळ दौऱ्यात पंतप्रधान मोदींना आत्मघातकी हल्ल्याची धमकी  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  Death threat to Prime Minister Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींना माजी पंतप्रधान राजीव गांधींप्रमाणेच आत्मघातकी हल्लाच्या धमक्या आल्या आहेत. मोदी सोमवारी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, एक धमकीचे पत्र मिळाले असून, त्यात पंतप्रधान मोदींना राजीव गांधींप्रमाणे बॉम्बफेक करण्यात येईल, असे लिहिले आहे. या धमकीच्या पत्राच्या माहितीवरून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. 
				  													
						
																							
									  
	भाजप प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या कार्यालयात कोची येथील एका व्यक्तीने मल्याळम भाषेत लिहिलेले पत्र प्राप्त झाल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी हे पत्र पोलिसांना सुपूर्द केले.
				  				  
	पोलिसांनी पत्राची चौकशी सुरू केली असता, त्यात पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता लिहिला होता. मूळचा कोचीचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सर्व आरोप फेटाळून लावले.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	त्याने सांगितले की मला अडकवण्यासाठी कोणीतरी हे केले असावे. पोलिसांनी चौकशी केल्यावर या पत्रामागे त्यांचा हात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारानंतर केरळ मध्ये हायअलर्ट जाहीर केले असून प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.  रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमानतळावर देखील तपासणी करण्यात येत आहे.पंतप्रधान येत्या 24 एप्रिल रोजी कोच्ची पोहोचणार आहेत. ते तिरुअनंतपुरम येथे राज्याला पहिली वंदेभारत एक्सप्रेस भेट देणार आहेत. धमकीचे पत्र आल्यामुळे राज्यात अलर्ट जाहीर केले आहे.   
				  																								
											
									  
	 
	Edited by - Priya Dixit