मोदींसारखे दिसणारे विकतायेत पाणी पुरी
सेलिब्रिटीसारखे लूक असणारे आणि त्यांची स्टाईल ठेवणारे अनेक लोक दिसत असतात. अशात आता इंस्टाग्रामवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखी दिसणारी एक व्यक्ती व्हायल होत आहे. ज्यांना पाहून लोक गोंधळून जात आहे की ते मोदीजी तर नाही.
ही व्यक्ती गुजरातमध्ये गोलगप्पे विकण्याचे काम करते. एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ बनवून इन्स्टावर शेअर केल्यावर हे प्रकरण व्हायरल झाले. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी ही व्यक्ती मोदीजींसारखी दिसत असल्याचेही म्हटले आहे. इतकंच नाही तर त्यांचा आवाजही पंतप्रधानांसारखाच असल्याचे म्हणत आहे.