बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (10:38 IST)

आज भारतीय हवाई दलाच्या 89 व्या वर्धापन दिनानिमित्त मोदी आणि राष्ट्रपतींनी अभिनंदन केले

भारत आज हवाई दलाचा 89 वा वर्धापन दिन साजरा करत आहे . भारतीय हवाई दला दिवस दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतीय हवाई दलाची स्थापना याच दिवशी 1932 मध्ये झाली. स्थापनेपासून भारतीय हवाई दलाने विविध युद्धे आणि मोहिमांमध्ये  (नैसर्गिक आपत्ती दरम्यान मानवी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहिमांसह)भाग घेतला आहे.
 
हिंडन एअरबेसवर भारतीय हवाई दलाचे प्रमुख आणि तीन सशस्त्र दलांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हवाई दल दिवस साजरा केला जातो. यानिमित्त हवाई दल दिनानिमित्त परेडचेही आयोजन करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेत्यांनी भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केले आणि त्यांच्या धैर्याला सलाम केला.
 
पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही हवाई दल दिनानिमित्त ट्विट केले आणि लिहिले की या अदम्य दलाच्या 89 व्या वर्धापन दिनानिमित्त, सर्व भारतीय हवाई दलाच्या जवानांना, त्यांच्या कुटुंबियांना अभिनंदन. अत्यंत तात्कालिकतेने आव्हानांना सामोरे जाणारे आणि राष्ट्राच्या सेवेत झोकून देण्याऱ्या आम्हाला आमच्या हवाईदलाचा अभिमान आहे.