1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 जानेवारी 2022 (14:44 IST)

ध्वजारोहणावेळी शॉक लागून दुर्देवी मृत्यू

बिहारमधील बक्सरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका सरकारी शाळेत भीषण अपघात झाला आहे. येथे पाईपमध्ये विजेचा प्रवाह सुरु झाल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. बक्सर जिल्ह्यातील इटाडी ब्लॉकमधील नाथपूर प्राथमिक शाळेत हा अपघात झाला. जखमींवर बक्सर येथील सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला आहे.
 
बक्सर येथील नाथपूर प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यासाठी लोखंडी पाईप लावण्यात आले होते, कार्यक्रमात 100 हून अधिक मुले सहभागी झाली होती. यावेळी ध्वजारोहण सुरू असताना अचानक लोखंडी पाईपवर  विजेचा तार पडला. पाईपमधून विद्युतप्रवाह गेला. ते पाहून तेथे एकच गोंधळ उडाला. पाईपच्या संपर्कात आल्याने चार मुले होरपळले. या घटनेतील जखमी झालेल्या चारही मुलांना सदर रुग्णालयात आणण्यात आले. पाचवीत शिकणाऱ्या शुभम कुमार या विद्यार्थ्याचा तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघांवर उपचार सुरू आहेत.