शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मेरठ-लखनऊ एक्स्प्रेसचे डबे घसरले, १५ जखमी

मेरठ-लखनऊ राज्यराणी एक्‍स्प्रेसचे डबे रूळांवरून खाली घसरल्याने अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशमधील रामपर येथे शनिवारी सकाळी 8.20च्या सुमारास रामपुरच्या कोसी पुलावर ही घटना घडली. यात 15 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी घेतली असून बचावकार्याला सुरूवात केली.

एक्‍स्प्रेसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यासाठी पर्यायी गाडीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नीरज शर्मा यांनी दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे.