सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (16:07 IST)

ट्विटरने आयटी मंत्री रविशंकर यांचे खाते 1 तासासाठी ब्लॉक केले

शुक्रवारी ट्विटरने कायदा आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक केले. तथापि, एका तासानंतर ते पुन्हा चालू झाले.
 
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवरुन त्यांना तासभर रोखले असल्याची माहिती दिली आहे. मंत्री यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे- ट्विटरने माझ्या खात्याचा तासभर प्रवेश रोखला. यासाठी अमेरिकेच्या Digital Millennium Copyright Act उल्लंघनाचा हवाला देण्यात आला.
 
केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये दोन स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. पहिल्या स्क्रीनशॉटमध्ये ट्विटरने असे कारण दिले आहे ज्यामुळे खात्यावर प्रवेश बंद झाला. दुसर्‍या स्क्रीनशॉटमध्ये खात्यात प्रवेश मिळवण्याविषयी माहिती देण्यात आली आहे.