गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जून 2019 (08:44 IST)

एक नव्हे दोन नव्हे तब्बल दोन महिलांकडे दहा कोटी रुपयांचे हिरे, आर्मीने त्यांना पकडले

Two million diamonds
आसाम रायफल्सच्या जवानांनी दोन महिलांकडून १६६७ ग्रॅम वजनाचे जवळपास बाजारभावानुसार १० कोटी रुपये किंमतीचे कच्चे हिरे पकडले आहेत. या महिलांना दक्षिण आसामच्या हैलाकंदी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आसाम रायफल्सच्या जवानांनी हैलाकंदी शहारापासून ९ किलोमीटर अंतरावरील मोनचेरा येथे एका रिक्षाचा शोध घेत असताना, दोन महिलांच्या पिशवीतून हे कच्चे हिरे जप्त केले आहेत. त्तायांना पकडले असून दोन्ही महिलांची ओळख पटली आहे. मोनिया संगमा, मिनाती संगमा अशी या महिलांची नावे आहेत. या दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे. आसाम रायफल्सच्या जवानांनी या दोघींना व जप्त करण्यात आलेले हिरे लाला पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.