गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

झारखंड: बस दरीत कोसळली, 6 ठार, 39 जखमी

झारखंडमधील एक बसचा अपघात झाला असून त्यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. गढवा-अंबिकापूर मार्गावर बस दरीत कोसळल्याने हा भीषण अपघाता झाला असून यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 39 जण जखमी झाले आहेत. अजून काही प्रवाशी बसखाली दबल्याची शंका असून बचाव कार्य सुरु आहे.
 
मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस छत्तीसगडमधील अंबिकापूरहून गढवा येथे जात होती. चालकाचा वाहणावरील तोल गेल्याने हा अपघात झाला असून घटनास्थळी ग्रामीण आणि पोलिसांनी मिळून जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले आहे. 
 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली. स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं. अन्य प्रवाशांचा शोध सुरु असून, मृतांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेतली जात आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
मृतकांमध्ये अंबिकापुर रहिवासी प्रदीप गुप्ता (50 वर्ष), हर्ष जायसवाल (10 वर्ष), बेलवाटीकर येथील प्रतिमा देवी सामील आहे. इतर लोकांची ओळख अजून पटलेली नाही. अनेक जखमी गंभीर अवस्थेत आहे. तरी स्थानिक लोकं आणि पोलिस अपघातात जखमी लोकांची मदत करत असून बसमधून बाहेर काढण्याचे बचाव कार्य सुरु आहे.