मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 28 मे 2019 (11:15 IST)

झारखंडमध्ये नक्षली आयईडी हल्ल्यात 15 जवान जखमी

झारखंडच्या सरायकेला खरसावामध्ये नक्षली हल्ल्यात 15 जवान जखमी झाले आहेत. या घटनेत पोलिस आणि कोब्राचे 15 जवान जखमी झाले. ही घटना पहाटे 4.53 वाजेच्या सुमारास घडली. ह्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांवर फायरिंग देखील केली. 
 
जखमी झालेल्या जवानांना रांची येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जवान गंभीर जखमी असल्याचे सांगितलं जात आहे. 
 
खरसावा येथे मोठ्या प्रमाणात नक्षलवादी एकत्र असल्याच्या माहितीवर जवानांनी खरसावा येथे सर्च ऑपरेशन सुरु केले होते. सर्च ऑपरेशन दरम्यान नक्षलवाद्यांकडून आयईडी बॉम्ब हल्ला करण्यात आला. यानंतर गोळीबार देखील झाला. 
 
सध्या परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पसार झालेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, गडचिरोलीत 30 एप्रिल रोजी नक्षल्यांनी पोलिसांना लक्ष्य करून हल्ला केला होता. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते.