बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 जून 2019 (09:40 IST)

मेहुल चोकसीला लवकरच भारतात आणल जाणार

देश सोडून पळालेला हिरे व्यापारी मेहुल चोकसीला लवकरच भारतात आणलं जाणार आहे. एन्टीगाचे पंतप्रधान यांनी मेहुल चोकसीचं एन्टीगा नागरिकत्व रद्द करून त्याला लवकरच भारतात परत पाठवण्यात येईल, असं जाहीर केलंय. एका स्थानिक वर्तमानपत्रानं ही बातमी दिलीय. याआधी भारतातून फरार झाल्यानंतर चोकसीनं एन्टीगामध्ये आसरा घेतला आहे. 
 
एन्टीगाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्रॉन यांच्या म्हणण्यानुसार, चोकसीचं एन्टीगा आणि बरबूडा नागरिकत्व लवकरच रद्द केलं जाईल. आपला देश अपराध्यांसाठी सुरक्षित जागा बनू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. अपराध्यांनाही कायदेशीर हक्क असतो. त्यांच्याकडे अजूनही कोर्टात जाण्याचा अधिकार अबाधित आहे. परंतु, लवकरच कायदेशीर प्रक्रिया उरकून आम्ही त्याला भारतात परत पाठवू, असं ब्रॉन यांनी म्हटलंय.