शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 मे 2020 (16:12 IST)

उध्दव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी अशी दिली आश्वासने

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना फोन करून सरकारमध्ये काँग्रेसचा सन्मान राखला जाईल, असं आश्वासन दिलं. तर कोरोनाविरोधी लढ्यात काँग्रेसचं पूर्ण सहकार्य राहील असं आश्वासन राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं.
 
महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार नाही, निर्णय प्रक्रियेत आम्ही प्रमुख सहभाग नाही, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फोन करून  संवाद साधला.
 
राहुल गांधी म्हणाले होते, मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि त्याकडे लोकांचं लक्ष आहे. तिथे कठीण परिस्थिती आहे आणि केंद्राने या राज्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.