गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2017 (11:03 IST)

पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेत नवीन काय? : उद्धव ठाकरे

uddhav thakare
पंतप्रधानांनी केलेल्या घोषणांपैकी अनेक घोषणा जुन्याच आहेत व ‘यूपीए’ सरकारच्या काळापासून चालू आहेत अशीही टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. या घोषणेत नवीन काय? ढोकळा जुनाच आहे, तो नव्याने गरम करून वाढलाय किंवा ढोकळा जुनाच, पण चटणी नवीन किंवा शिल्लक कांदाभजी नव्याने तळून ‘गरम’ म्हणून विकणे असा प्रकार आहे. मात्र असे शिळे, तळकट, तुपकट खाणे हे आरोग्यास शेवटी हानीकारकच ठरते. अ‍ॅसिडीटी, घसा खवखवणे, अपचन, हृदयाच्या रक्तवाहिन्यांत दोष व शेवटी झटक्याने मृत्यू संभवतो. असा टोला उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे.