केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे पुन्हा वादात
ताजमहाल हा मुघलसम्राट शहाजनाने नव्हे तर मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधला होता, असा आश्चर्यकारक दावा केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केला. कर्नाटकच्या कोडगु जिल्ह्यातील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, ताजमहाल हा मुसलमानांनी बांधला नव्हता. खुद्द शहाजानने आपल्या आत्मचरित्रात ताजमहाल राजा जयसिंग यांनी बांधल्याचे स्पष्ट केले आहे. ताजमहाल हे मुळात एक शिवमंदिर आहे, असे हेगडे यांनी म्हटले. इतकेच नव्हे हिंदू समाज असाच झोपून राहिला तर एक दिवस तुमच्या घरांवर 'मकान' ऐवजी 'मंजिल' अशा पाट्या लागतील. एवढेच नव्हे तर भविष्यात श्रीरामाला 'जहांपनाह' आणि सीतेला 'बीबी', अशी हाक मारावी लागेल, असेही हेगडे यांनी म्हटले.
हेगडे यांचे हे संपूर्ण भाषणच वादग्रस्त ठरले आहे. जातीसंदर्भात विचार न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे. आपल्याला समाजाची प्राथमिकता ठरवायला हवी. हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात छाटायला पाहिजेत. इतिहास असाच लिहला जातो. तुम्ही ज्यावेळी इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात हिंमत येते. इतिहास लिहायचा की वाचायचा हे तुम्हीच ठरवा, असे हेगडे यांनी सांगितले.