1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified गुरूवार, 30 जून 2022 (15:38 IST)

येथे वर निवडण्याची अनोखी परंपरा, लांबलांबून येतात लोक

बिहारमध्ये पकडवा विवाह याबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका बातमीबद्दल सांगत आहोत जी वाचल्यानंतर तुम्हीही वाह म्हणाल. सविस्तर जाणून घेऊ या संपूर्ण प्रकरण काय आहे? 
 
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात सौराठ सभेचे आयोजन केले जाते, जेथे वधू-वर पक्षाचे लोक येतात. राहिका येथे होणाऱ्या सभेला हजारो लोक जमतात आणि तिथे वराला पसंती दिली जाते. कोरोनाच्या काळात हा कार्यक्रम होऊ शकला नाही, मात्र आता पुन्हा आजपासून बैठक आयोजित केली जात आहे जी संपूर्ण आठवडाभर चालणार आहे.

अनेक वर्षांपासून सौराठ सभेचे आयोजन
मधुबनीच्या राहिका येथे मैथिल ब्राह्मणांच्या विवाह संबंधासाठी अनेक वर्षांपासून सौराठ सभेचे आयोजन केले जाते. 8 जुलैपर्यंत श्री रामचरितमानस पठणासह सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून वर आणि त्याचे लोक पोहोचत आहेत. विशेष म्हणजे या सभेत लग्नाआधी वराचे पूर्वज, एकूण गोत्र आणि राशी जुळण्यासाठी राज्याबाहेरूनही लोक येथे पोहोचतात. हिंदुस्थानातील विविध राज्यांव्यतिरिक्त, नेपाळमध्ये स्थायिक झालेल्या मैथिल ब्राह्मणांचाही राहिका ब्लॉकच्या सौरथ सभा परंपरेत समावेश आहे. आकडेवारीबद्दल बोलायचे तर, 2020 मध्ये कोरोना कालावधीमुळे हा कार्यक्रम झाला नाही. त्याच वेळी, 2021 मध्ये, सुमारे 10 हजार लोक उपस्थित होते, ज्यामध्ये सुमारे 450 नातेसंबंधांचा निर्णय घेण्यात आला होता.
 
सभेला उपस्थित असलेल्या लोकांचा ड्रेस कोड धोती-कुर्ता आणि मिथिला पग आहे, सर्व लोक हा पोशाख परिधान करून आनंदाने सहभागी होत आहेत. डिजीटल युगात अशा कार्यक्रमांमुळे लोकसंस्कृतीला चालना मिळत असून ही परंपरा जिवंत राहावी, हे कौतुकास्पद आहे, असे सभेला आलेल्या दूरदूरवरून आलेल्या नागरिकांनी सांगितले.