1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 29 जून 2022 (16:02 IST)

फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन

devendra fadnavis raj
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहेमहाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमताच्या कसोटीला सामोरे जावे लागणार आहे दुसरीकडे भाजपनेही सत्तेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या.यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. 
 
 अविश्वास दर्शक ठराव पास करण्यासाठी भाजपानं कंबर कसलीय. महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये चुरशीची लढत आहे. त्यामुळे प््रत्येक मत हे निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आहे. विधानसभेत मनसेचा 1 आमदार आहे. त्या आमदाराच्या पाठिंब्यासाठी फडणवीस यांनी राज यांना फोन केलाय. गुरुवारी मनसे भाजपाच्या बाजूनं मतदान करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.