देशात अविवाहित महिलांमध्ये कंडोम वापरण्याचे प्रमाण वाढले
भारतात अविवाहित महिलांमध्ये कंडोम वापरण्याचं प्रमाण वाढल आहे. आरोग्य विभागाने नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षणात ही गोष्ट पुढे आली आहे. यात लग्नाआधीच कंडोमचा वापर करणाऱ्या महिलांचं प्रमाण ६ टक्क्यांनी वाढलं आहे. मागील १० वर्षांमध्ये अशा महिलांचा आकडा 2 टक्क्यावरुन १२ टक्करे झाला आहे. हा सर्वे १५ ते ४९ वर्षांच्या मधील अविवाहीत महिलांमध्ये करण्यात आला. सर्वेमध्ये हे समोर आलं आहे की, सर्वात अधिक कंडोम वापरणाऱ्या महिला २० ते २४ वर्षांच्या मध्ये आहे. या सर्वेमध्ये हे देखील समोर आलं आहे की, ८ मधील ३ पुरुषांचं असं मत आहे की, कॉन्ट्रासेप्शनची काळजी घेणं हे महिलांचं काम आहे. पुरुषांना याची काळजी करण्याची गरज नाही.
सर्वे रिपोर्टनुसार १५ ते ४९ वर्षाच्या मधील देशातील ९९ टक्के जोडप्यांना फक्त १ टक्केच गर्भनिरोधकबद्दल माहिती असते. देशातील १५ ते ४९ वर्षातील विवाहित महिलांमध्ये गर्भनिरोधक प्रचार दर फक्त ५४ टक्के आहे. यामध्ये १० टक्के महिला अशा देखील आहेत ज्या गर्भनिरोधक म्हणून मॉडर्न प्रकारांचा वापर करतात. कंडोमपासून इतर गर्भनिरोधक गोष्टी वापरण्यामध्ये पंजाब पहिल्या क्रमांकावर आहे. मणिपूर, बिहार आणि मेघालयमध्ये सर्वात कमी याचा वापर होता. त्याचं प्रमाण या राज्यांमध्ये 24 टक्के आहे. पंजाबमध्ये हे प्रमाण 76 टक्के आहे.