शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मे 2023 (15:42 IST)

UPSC CSE Final Result 2022 Out: UPSC नागरी सेवा अंतिम निकाल जाहीर

result
UPSC CSE अंतिम निकाल 2022 @upsc.gov.in:  UPSC CSE अंतिम निकाल 2022 @upsc.gov.in: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षेचा (UPSC CSE 2022) अंतिम निकाल जाहीर केला आहे. 
इशिता किशोरने CSE 2022 मध्ये टॉप केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर गरिमा लोहिया आणि तिसऱ्या क्रमांकावर उमा हरती एन. चौथा क्रमांक मयूर हजारिका आणि पाचवा क्रमांक नव्या जेम्सने मिळविला. आयएएस परीक्षेत बसलेले उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर अंतिम निकाल पाहू शकतात. 
 
निकालात एकूण 933 उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड झाली आहे. यापैकी 345 उमेदवार अनारक्षित, 99 EWS, 263 OBC, 154 SC आणि 72 ST प्रवर्गातील आहेत 178 उमेदवारांची राखीव यादीही तयार करण्यात आली आहे. IAS पदांवर निवडीसाठी 180 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
 
यंदा नागरी सेवा परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. अव्वल ४ स्थानांवर मुली आहेत.सुमारे 15 दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर होतील. UPSC नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखती 18 एप्रिलपर्यंत चालल्या. ३० जानेवारीपासून मुलाखतीची फेरी सुरू झाली मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या सुमारे 2,529 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. नागरी सेवा परीक्षा 2022 अंतर्गत, UPSC ने IAS, IPS सह सेवांमध्ये 1011 पदांची भरती केली होती. 
 
 
Edited by - Priya Dixit