Uttar Pradesh : रान मांजरीने बाळाला छतावरून फेकले, बाळाचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका रान मांजरीने निष्पाप चिमुकल्याला उचलून नेले आणि घराच्या छतावरून खाली फेकले. या मुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात उसावा ठाण्याच्या हददीतील गौतारा पट्टी या गावात आई जवळ झोपलेल्या जुळ्या बाळांपैकी एका बाळाला रान मांजरीने उचलून नेले आणि छतावरून खाली फेकले. या मुळे बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंब धक्क्यात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतारा पट्टी भोंनी गावात हसनची आसमा आसमा ने 15 दिवसांपूर्वी दोन जुळ्या बाळांना अल्शीफा आणि मुलगा रेहान ला जन्म दिला. हसन ने सांगितले की जुळ्या मुलांचा जन्म झाल्यापासून एक रान मांजर दररोज घरी येत असे. पण घरातील सदस्य तिला हाकलून लावायचे .
सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास रान मांजरी ने आई जवळ निजलेल्या रियान ला तोंडातून धरून नेले. आसमाला जाग आली आणि तिने ताबडतोब आरडाओरड केली. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून हसन रान मांजरीच्या मागे धावत गेला. पण तो पर्यंत रान मांजरीने बाळाला छतावरून खाली टाकून दिले.
मुलाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे.
Edited by - Priya Dixit