सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जून 2018 (15:06 IST)

वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग मात्र प्रकृती स्थिर

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मूत्रसंसर्ग झाला आहे. दिल्लीतील 'एम्स'ने मेडिकल बुलेटीन जारी करुन याबाबत माहिती दिली. वाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही त्यांनी नमूद केले आहे. यानुसार त्यांना सध्या ताप नाही, रक्तदाबाचा त्रासही नाही. मात्र मूत्रसंसर्ग झाला असून त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवले आहे. उद्या सकाळी डिस्चार्ज दिला जाईल असे सध्या तरी चित्र आहे. वाजपेयींना क्रिटिकल केअर युनिट म्हणजेच सीसीयू मध्ये ठेवले आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली सर्जरीनंतर अजूनही 'एम्स'मध्येच आहेत. रुग्णालयात एकच व्हीव्हीआयपी रुम आहे. त्यामुळे वाजपेयींना सीसीयूमध्येच ठेवण्यात आल असून, अनके राजकारणी त्यांची विचारपूस करत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दिल्लीत, एम्स हास्पिटलमध्ये जाऊन प्रकृतीची विचारपूस केली आहे. दुसरीकडे अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी देशभरात पूजा-प्रार्थना, हवन करण्यात येत आहेत.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर संध्याकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवानी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली.