बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (14:44 IST)

Varanasi : पाण्यातील करंट पासून मुलाला वृद्धाने वाचवले

current
वाराणसी शहरातील हबीबपुरा भागात मंगळवारी सकाळी चार वर्षीय कार्तिकला विजेचा धक्का बसला. तेथून जाणाऱ्या  वृद्धांच्या प्रसंगावधानामुळे  त्यांचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना सीसी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 
एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला  टेलिफोनच्या खांबाच्या विजेचा धक्का बसला. तो वाटेतच तडफडत होता.

त्याला तडफडत पाहून स्थानिक लोकांनी लाकडी काठीने त्याला खांबापासून दूर ढकलून त्याचा जीव वाचवला. खांबावरून विद्युत तार गेल्यामुळे त्याला विजेचा धक्का बसला. ही घटना सिगरा पोलीस स्टेशन हद्दीतील लल्लापुरा येथील हबीबपुरा येथे मंगळवारी सकाळी घडली असून याप्रकरणी वीज विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
 
रेस्टॉरंटमध्ये काम करणारा जितेंद्र पत्नी अंजू आणि तीन मुलांसह हबीबपुरा येथे भाड्याने राहतो. सकाळी साडेदहा वाजता सर्वात धाकटा मुलगा पाच वर्षांचा कार्तिक पाण्याची बाटली घेण्यासाठी घराबाहेर पडला. सकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या दूरध्वनी खांबावर विद्युत प्रवाह उतरल्याने तो पाण्यात पडला असता काही अंतरावर गेला होता. हे पाहून तेथून जाणारे लोक थांबले. मूल रस्त्यावर कसे पडले हे सुरुवातीला लोकांना समजले नाही. काही लोक त्याला उचलण्यासाठी पोहोचले आणि त्यांना स्पर्श करताच त्यांना विजेचा झटका बसला आणि त्यानंतर मुलाला विजेचा धक्का लागल्याचे त्यांना समजले.कोणाला समजेना की काय करावं.
 
तितक्यात प्रसंगवधान राखत भाजी विक्रेता कल्लू यांनी  लाकडी काठी आणली आणि मुलाला विजेच्या धक्क्यापासून दूर खेचले. त्याची प्रकृती ठीक असल्याचे पाहून त्याला घरी नेले. या घटनेमुळे मूल बराच वेळ हादरला होता. 
 
निष्काळजीपणा धोक्याचा : काही जणांनी दूरध्वनी खांबावरील विजेची तार नेली असून वीज पडली. त्याच्या खांबावरून वाय-फायच्या ताराही गेल्या आहेत. विद्युत तार तुटल्याने टेलिफोनच्या खांबामध्ये विद्युत प्रवाह वाहू लागला असण्याची शक्यता असून, पावसानंतर साचलेल्या पाण्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. विद्युत प्रवाहामुळे या पाण्यात पडल्याने बालकाची तडफड सुरू होती.कल्लूच्या प्रसंगावधानामुळे त्या चिमुकल्याचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 




Edited by - Priya Dixit