शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (19:01 IST)

पश्चिम बंगाल मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हिंसाचार उसळला

crime
पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा येथील कुलतली पोलीस ठाण्यांतर्गत कृपाखली भागात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलीस तक्रार नोंदवत नसल्याचा आरोप करत पोलीस ठाण्याची तोडफोड केली. 

सदर घटना पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणा येथील आहे. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला शिकवणीवरून परत येताना तिचा अपहरण करून तिच्यावर नराधमाने बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली असून ग्रामस्थांनी तिच्या मृतदेहाला नदीपात्रातून बाहेर काढले. या प्रकरणी ग्रामस्थांनी कुलटाळी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवायला गेले असता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही असा आरोप केला आहे. संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याची तोडफोड करून जाळपोळ केली. 

या प्रकरणी भाजपच्या नेत्याने ममता सरकारवर ताशेरे ओढले आहे. निष्पाप मुलासोबत घडलेल्या भयानक घटनेवरून ममता बॅनर्जींचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याचे दिसून येते असे ते म्हणाले. 
Edited by - Priya Dixit