आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्स या परीक्षेत नाशिकच्या वृंदा नंदकुमार राठी या विद्यार्थिनीने मुलींमध्ये देशात प्रथम येण्याचा मान मिळविला. अभियांत्रिकीसाठी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून 13 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. वृंदाने 321 गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावलं. वृंदा ही नाशिक रोड येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.