गौप्यस्फोट : वानखेडे यांनी शाहरुख खान सोबतच्या संभाषणाची प्रत जोडली
मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडे यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत याचिका सोबत जोडली आहे. माझ्या मुलाची काळजी घे, असं अनेकदा शाहरुख खान संभाषणात म्हणत असल्याचं दिसून येत आहे.
शाहरूख खानने समीर वानखेडे यांना केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉटही न्यायालयासमोर ठेवण्यात आला. समीर वानखेडे यांनी याचिकेत शाहरूख खानसोबतचे ३ आणि ४ ऑक्टोबरचे मेसेज उघड केले आहेत. शाहरूखने आपल्याला पाठवलेले मेसेज वानखेडे यांनी मांडले असून शाहरूखने आपल्याशी प्रथम संपर्क साधल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे. तसेच शाहरूखने त्यांच्या कार्याचे कौतुक केले असल्याचे पुरावे समीर वानखेडे यांनी न्यायालयात सादर केले आहेत. तसेच मुलगा आर्यन खानच्या सुटकेसाठी शाहरूखने सहकार्याची विनंती केल्याचे समोर येत आहे. सध्यातरी शाहरुख खानचे १० मेसेज हाती लागले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor