शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (07:55 IST)

ऑगस्ट महिन्यात गोवा तसेच महाराष्ट्रात पाऊस कमी राहण्याचा इशारा

rain
देशभरात ऑगस्ट तसेच सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत नैऋत्य मोसमी पाऊस सर्वसाधारण राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात गोवा तसेच महाराष्ट्रात पाऊस कमी राहण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
 
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहोपात्रा यांनी मान्सूनचा ऑगस्ट व सप्टेंबर हा दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. ते म्हणाले, जून तसेच जुलै महिन्यात सरासरीच्या 8 टक्के अधिकचा पाऊस नोंद झाला आहे. जून महिन्यात पावसाची तूट राहिली असली, तरी जुलै महिन्यातील पावसाने ती भरून काढली आहे. जुलै महिन्यात 4 कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाली. त्याचा प्रभाव साधारण 21 दिवस राहिला. यामुळे अनेक भागात दमदार पाऊस झाला. जुलै महिन्यात पूर्व तसेच पूर्वोत्तर भारतात सरासरीच्या 45 टक्के कमी पाऊस झाला असून, तो मागच्या 122 वर्षांतील सर्वात नीचांकी झाला आहे. तसेच जुलै महिन्यात पश्चिम किनारपट्टीवर सर्वाधिक पावसाच्या नोंदी झाल्या आहेत.