गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (23:01 IST)

बुरखा घातला पण हेल्मेट नाही; आता ही महिला रुग्णालयात जीवन-मरणाची झुंज देत आहे

burkha
सध्या देशातील अनेक भागात बुरखा घालण्याची चळवळ सुरू आहे, याच दरम्यान एक अशी बातमी समोर आली आहे जी अनेक महिलांना धडा शिकवू शकते. बुलंदशहरमधील 23 वर्षीय सफिना 6 आठवड्यांची गर्भवती असून सध्या एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. वास्तविक, सफिना तिच्या पतीसोबत बाईकवर होती, सफिनाचा नवरा बाईक चालवत होता आणि सफिना मागे बसली होती. मात्र तिने हेल्मेट न घालता बुरखा घातला होता.  
 
बुरखा बाईकमध्ये अडकला
रस्त्यावर दुचाकी चालवत असताना सफीनाचा बुरखा दुचाकीच्या टायरमध्ये अडकला. दुचाकी तीन वेळा उलटली आणि नंतर घसरली. भरधाव वेगात सफिना दुचाकीवरून खाली पडली. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या दरियापूरमध्ये रात्री उशिरा ही घटना घडली. अपघातानंतर जखमी सफीनाला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथून तिला दिल्लीला रेफर करण्यात आले. 
 
सफिना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आहे 
31 मार्चच्या रात्री सफिना आणि तिचा पती या दोघांनाही एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले. तिचा नवरा बरा आहे. नवऱ्याने हेल्मेट घातले होते पण सफिनाने हेल्मेट घातले नव्हते. सफीनाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 1 एप्रिल रोजी सफीनाच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली.  
 
सफिना अजूनही शुद्धीत नाही
तरीही सफीना शुद्धीवर आलेली नाही. सफिनावर उपचार करत असलेले एम्सचे न्यूरोसर्जन डॉ दीपक गुप्ता यांना आशा आहे की ती लवकरच तिच्या गंभीर स्थितीतून बाहेर येईल, परंतु धोका अद्याप संपलेला नाही. डॉ गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, दुचाकीस्वार म्हणजेच दुचाकीवर मागे बसलेल्या महिला अनेकदा हेल्मेट घालत नाहीत आणि ही बाब हेल्मेटचे महत्त्व स्पष्ट करत आहे. महिलेचा पती सुरक्षित आहे पण सफिना आता जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत आहे.