शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बंगालने जिंकली रसगुल्ल्याची लढाई

रसगुल्ल्याची लढाई पश्चिम बंगालने जिंकली. आता आपल्या हा प्रश्न उद्भवत असेल की रसगुल्ल्याची कसली लढाई तर रसगुल्ल्यावरील हक्कावरून पश्चिम बंगाल आणि ओडिशा सरकारमध्ये चाललेला अनेक वर्षांचा वाद आता निकालात निघाला आहे. पश्चिम बंगाल सरकारला रसगुल्ल्यासाठी भौगोलिक संकेतांक (जीआय टॅग) मिळाला.
 
या बातमीनंतर ममता बॅनर्जी यांनी ट्विट करुन आनंद व्यक्त केला. सर्वांसाठी गोड बातमी आहे की आता रसगुल्ल्यावर आमचा अधिकार सिद्ध झाला आहे. त्यांचा या ट्विटनंतर आम आणि खास सर्वंलोकांना खूपच आनंद झाला.

पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये रसगुल्ल्याचा शोध कोठे लागला यावरून ओढाताण सुरू होती.  600 वर्षांअगोदर देखील ओडिशामध्ये रसगुल्ले तयार केले जायचे. भगवान जगन्नाथाचा नैवैद्य खीर मोहनशी याचा संदर्भ घेत 2015 मध्ये ओडिशाचे विज्ञान तसेच तंत्रज्ञान मंत्री प्रदीप कुमार पाणिग्रही यांनी हा दावा केला होता. ओडिशाच्या या दाव्याच्या विरोधात पश्चिम बंगाल सरकारने न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला होता.
 
रसगुल्ल्याचे उगमस्थान आपल्या राज्यात असल्याचे पश्चिम बंगाल सरकारचे म्हणणे होते. रसगुल्ल्याचा जनक बंगाल असल्याचे वक्तव्य तेथील अन्नप्रक्रिया मंत्री अब्दुर्रज्जाग मोल्लांनी केले.
 
बंगालच रसगुल्ल्यांचा जनक असल्याचा दावा त्यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर केला. बंगालचे प्रख्यात मिठाई निर्माते नवीनचंद्र दास यांनी 1868 च्या अगोदर रसगुल्ल्यांची सर्वात प्रथम निर्मिती केल्याचे ते म्हणाले. रसगुल्ला छेन्यापासून तयार होतो आणि छेना हा पदार्थ बंगालचाच आहे, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली. ओडिशाच्या रसगुल्ल्याप वापरण्यात येणारा रस आणि बंगालच्या रसगुल्ल्यात वापरण्यात येणारा रस वेगळे आहेत. त्यांचे घनत्व देखील वेगळे असल्याचा युक्तिवाद ममता बॅनर्जी सरकारने केला. आणि अखेर बंगालने ही लढाई जिंकली.