शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (20:40 IST)

वेस्टर्न वेअर vs साडी :अक्विला रेस्टॉरंटला टाळे

साडी परिधान केलेल्या प्रवेश नाकारणाऱ्या अंसल प्लाझा येथील अक्विला रेस्टॉरंटला टाळे लागले आहे. दक्षिण दिल्ली नगर निगमने (SMCD) हे रेस्टॉरंट बंद करण्याची नोटीस बजावली. त्यानंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे.
 
अक्विला रेस्टॉरंटमध्ये एका महिलेला साडी घातल्याने कथितरित्या प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने बंद करण्याची नोटीस बजावल्यानंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. दरम्यान, नोटीसमध्ये अलीकडील या घटनेचा उल्लेख नाही. त्याऐवजी दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने आरोप केला आहे की रेस्टॉरंट हेल्थ ट्रेड लायसन्सशिवाय चालत होते. त्यानंतर मालकाला नोटीस बजावण्यात आली आणि त्याने हे हॉटेल बंद केले.