काय सांगता,सापाला चावून बदला घेतला
आता पर्यंत साप बदला घेतो हेच ऐकले होते.परंतु आता एका व्यक्तीने चक्क सापाला चावून आपला बदला पूर्ण केला आणि सापाचा या प्रकरणात मृत्यू झाला.हे प्रथमच ऐकण्यात आले आहे.
ही विचित्र घटना ओडिशातील जाजपूर येथे घडली आहे.या माणसाला सापाने चावले होते.या घटनेमुळे ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील दानागढीत राहणारा 45 वर्षीय किशोर बद्रा चर्चेत आला आहे.
प्रकरण असे आहे की,बुधवारी किशोर शेतातून घरी परत येताना त्याला एका सापाने त्याचा चावा घेतला. त्याला पायाला काही टोचल्यासारखे जाणवले.काळोख असल्यामुळे टॉर्च लावून काय टोचले हे बघितले,तर एक साप त्याच्या पायावर असल्याचे बघितले. 'त्याने माझा चावा घेतला होता.मला राग आला आणि मी त्या सापाला पकडून त्याचा चावा घेतला आणि तो साप मेला.'असं किशोरने सांगितले.
किशोरने सापाचा चावा घेतला आणि त्यात साप मेला. ही बातमी वाऱ्याप्रमाणे गावात पसरली.गावातील लोकांनी त्याला साप चावल्यामुळे डॉक्टरांकडे जाण्यास सांगितले.परंतु तो काही डॉक्टरांकडे गेला नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे की सापाचा चावा घेऊन देखील किशोरची प्रकृती एकदम ठणठणीत आहे.