गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (16:36 IST)

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण कोणाला ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत, भाजपा नेत्या उमा भारती, अवधेशानंद सरस्वती, साध्वी ऋतंभरा, रामभद्राचार्य, इकबाल अन्सारी, कल्याण सिंह, विनय कटियार यांनादेखील भूमिपूजनासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. 
 
दरम्यान, भूमिपूजनाच्या कार्यक्रमला कोणतेही केंद्रीय मंत्री सहभागी होण्याचं चिन्ह कमी आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह हे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आता ते येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. तर वयापरत्वे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हेदेखील अयोध्येत येण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येत आहे.
 
याव्यतिरिक्त कोणत्याही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. तसंच कोणतेही उद्योगपती या कार्यक्रमात सामिल होणार नाहीत. परंतु सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना मात्र या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.