Yogi Adityanath :उत्तरप्रदेशचे सीएम योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी
Cm yogi adityanath yogi :उत्तरप्रदेशातून एक मोठी खळबळजनक बातमी येत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या वर बॉम्ब हल्ला करून त्यांना तीन दिवसातच उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.यावेळीही यूपी-112 येथील व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज पाठवून धमकी देण्यात आली.धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री योगींना येत्या तीन दिवसांत बॉम्बने उडवले जाईल.असे म्हटले आहे. याप्रकरणी सुशांत गोल्फ सिटी कोतवाली येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.पोलीस प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कंट्रोल रूम यूपी-112 चे ऑपरेशन कमांडर सुभाष कुमार यांनी एफआयआर दाखल केला आहे की 2 ऑगस्टच्या संध्याकाळी ऑपरेशन इंटरनेट मीडियाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एक संदेश आला की सीएम योगींना तीन दिवसात बॉम्बस्फोट केला जाईल. या प्रकरणी उत्तरप्रदेशचे पोलीस तपास करत आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.बरीच माहिती मिळाली. लवकरच पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचतील.असे पोलिसांनी सांगितले.