सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2023 (18:40 IST)

Zomato Delivery Boy:चिमुकलीसोबत डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल

social media
पालक आपल्या मुलांसाठी काहीही करतात. त्यांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी कितीही कष्ट करतात. पोटापाण्यासाठी आणि लहान लेकरांसाठी आई आणि वडील कष्ट करतात. काल आईच्या कुशीत चिमुकली असून आई रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता सध्या लहान चिमुकलीला घेऊन एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  
 
आपल्या लेकीला कुशीत घेऊन हा डिलिव्हरी बॉय ग्राहकाच्या दारी फूडची डिलिव्हरी करण्यासाठी गेला. काहींनी त्याच्यावर द्या करून काही पैसे देण्याची इच्छा केली.पण त्याने कष्टाने काम करण्याचा मार्ग निवडल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. हा व्हिडीओ एका फूड व्लॉगरने हा व्हिडिओ शेअर केला जो व्हायरल झाला आणि लाखो वेळा पाहिला गेला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “हे पाहून मला खूप प्रेरणा मिळाली; झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपल्या दोनमुलांसह सम्पूर्ण दिवस उन्हात घालवतो. आपण हे शिकले पाहिजे की माणूस हवा असेल तर काहीही करू शकतो.   

व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय फूड ऑर्डर देण्यासाठी ग्राहकाच्या दारात उभा असून त्याने आपल्या कुशीत चिमुकलीला घेतलेले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून झोमॅटोने व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली असून त्याला मदतीचा हात पुढे केला आहे. झोमॅटोने कमेंट बॉक्स मध्ये ''कृपया ऑर्डर चे तपशील पर्सनल मेसेज मध्ये शेअर करा जेणे करून डिलिव्हरी बॉय पर्यंत मदत करता येईल. या व्हिडिओला 1 मिलियनहुन अधिक व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहे. 
  
 
 



Edited by - Priya Dixit