1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 19 सप्टेंबर 2015 (09:46 IST)

इंदिरा गांधी सत्तालोलूप

markandey katju
आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कडेय काटजू यांनी आणखी एक विधान केले आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांसारख्या लोकांचा सन्मान आपण का करावा, असा सवाल काटजू यांनी उपस्थित केला आहे.
 
काटजू यांनी यासंबंधी ब्लॉग लिहिला आहे. आपण भाजप सरकारचे समर्थक नसलो तरी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची छायाचित्रे असलेली तिकिटे बंद करण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
 
इंदिरा गांधी ही सत्तालोलूप स्त्री होती, ज्या सत्तेवर राहण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्यास तयार होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणूक गैरव्यवहारात दोषी ठरविल्याने त्यांनी 1975 मध्ये बनावट आणीबाणी लागू केली होती, असा सणसणीत आरोप काटजू यांनी केला आहे.
 
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावरील टपाल तिकिटे बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून टीका करणार्‍या काटजू यांनी गांधी घराण्याला टपाल 
तिकिटावरून हद्दपार करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.