शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

बोडण हे ब्रह्मोदन किंवा बहुधन!

बोडण हा एक कुळधर्म, कुळाचार आहे. बोडण हा शब्द ब्रह्मोदन किंवा बहुधन याचा अपभ्रंश असावा. मोटन म्हणजे बोडन म्हणजेच बोडण असा हा शब्द तयार झाला असावा. असे कृ.पा. कुळकर्णी यांचे मत आहे. विघ्नांचे मोटन म्हणजे चूर्ण ज्या आचाराने होते ते बोडण होय.

महाराष्ट्रात कित्केच कोकणस्थ आणि देशस्थ ब्राह्मण आणि कर्नाटकातही अनेक ठिकाणी हा कुळाचार रूढ आहे. चार सुवासिनी आणि एक कुमारिका अशा स्त्रिया वर्तळाकार बसतात. एका परातीत पुरणावरणासह सर्व तयार स्वयंपाक ठेवतात. त्यात तूप, दूध, दहीचे स्नान त्यात ठेवलेल्या देवीला घालतात. आणि सर्व अन्न सर्वजणी कालवितात. 

कुमारिका ही देवी आहे असे समजून तिला पाहिजे असलेला पदार्थ मागण्यास सांगतात. तो पदार्ध मिसळून पुन्हा कालवितात. बोडण कालविताना एखाद्या स्त्रीच्या अंगातही येत असते. तिची ओटी भरून हळदकुंकू लावून तिला नमस्कार करतात. कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी कार्य निर्विघ्न रितीने पार पाडल्याबद्दल तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यानंतरही बोडण भरण्याची पद्धत आहे.