या नवरात्री दे दान, दाखवून रौद्ररूप!!
दिव्य शक्ती, तुझे प्रखर तेज,
वर्णावा महिमा, मानवा रोज,
प्रेरणा घ्यावी, मागावी भक्ती,
जन्ममरणा तुन मिळेल मुक्ती,
प्रेमळ नजर तिची फिरे भक्तांवर,
लेकरा साठी तिची मायापाखर,
नराधमांना कर शिक्षा तू जबर,
न धजले पाहीजे, पाप करण्या वारंवार,
कित्ती तरी अबला, झाल्या शिकार,
कळे न मला कधी थांबेल हे चक्र,
आता भरले त्यांचे पाप, दाखव उग्र रूप,
या नवरात्री दे दान, दाखवून रौद्ररूप!!
...अश्विनी थत्ते