शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (10:09 IST)

नवरात्री विशेष: घटस्थापना शुभ मुहूर्त

यंदाच्या वर्षी 17 ऑक्टोबर 2020 पासून शारदीय नवरात्र सुरु होणार आहेत. नवरात्राचे हे नऊ दिवस आई दुर्गेच्या पूजेचे आराधनेचे असतात. बरेच भाविक या नऊ दिवसात आपल्या घरात घटस्थापना करून अखंड दिवा लावतात आणि नऊ दिवसांचे उपवास करतात.
 
चला तर मग जाणून घेऊया की नवरात्रात घट स्थापना आणि अखंड दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे. 
 
वेबदुनियाचे ज्योतिषी पं. हेमन्त रिछारिया यांचा म्हणण्यानुसार नवरात्राच्या घट स्थापनेचे मुहूर्त खालील प्रमाणे आहे.
 
अभिजित मुहूर्त -
 दुपारी 11:41 ते 12:27 मिनिटांपर्यंत.
 
सकाळचे मुहूर्त -
सकाळी 7:45 ते सकाळी 9:11 मिनिटांपर्यंत. 
सकाळी 12:00 वाजे पासून 4:30 मिनिटांपर्यंत.
 
संध्याकाळचा मुहूर्त 
संध्याकाळी 6:00 ते 7:30 मिनिटांपर्यंत.
 
रात्रीचा मुहूर्त
रात्री 9:00 ते 12:04 मिनिटांपर्यंत.
 
कोणत्या लग्नघटिकेत करावी घट स्थापना -
देवीच्या पूजेत शुद्ध मुहूर्त आणि योग्य आणि शास्त्रोक्त पूजेच्या विधीचे फार महत्व आहे. शास्त्रात विविध लग्न घटिकानुसार घटस्थापनेचे महत्व सांगितले आहेत. 
 
शुभ लग्न - 
(1) 1 - मेष लग्न -  धनलाभ- वेळ- 6:07 ते 7:44 मिनिटांपर्यंत.
(2) 4 - कर्क लग्न - सिद्धी- वेळ - 11: 57 ते 2:12 मिनिटांपर्यंत.
(3) 6 -  कन्या लग्न - लक्ष्मी प्राप्ति- वेळ- पहाटे 4:29 पासून ते 6:44 मिनिटांपर्यंत.
(4) 7 - तूळ लग्न - ऐश्वर्य प्राप्ती - वेळ 6:44 ते 9:02 मिनिटांपर्यंत.
(5) 8 - वृश्चिक लग्न - धनलाभ - वेळ 9:02 ते 11:19 मिनिटांपर्यंत.
(6) 10 - मकर लग्न - पुण्यप्रद - वेळ 1:24 ते 3:09 मिनिटांपर्यंत.
(7) 11 - कुंभ लग्न  - धन, संपदा, समृद्धी प्राप्ती - वेळ 3:09 ते 4:40 मिनिटांपर्यंत.
 
अशुभ लग्न - 
(1) 2 - वृष लग्न - त्रास होतो.
(2) 3 - मिथुन लग्न - मुलांना त्रास होतो. 
(3) 5 - सिंह लग्न - बुद्धीचा नाश होतो.
(4) 9 - धनु लग्न - मानभंग होतो.
(5) 12 - मीन लग्न - तोटा आणि दुःखाची प्राप्ती होते.